थँक्यू शेतकरी दादा – भाग २

Uncategorized

या सारख्या “अगणित समस्यांना “ तोंड दिल्यानंतर तो आपल पीक कसबस पिकवतो त्यानंतर सुरू होते ती खरी ” परीक्षा “. पीक काढायचा, ते भरायचा, त्यानंतर परत ” बाजारात ” घेऊन जायचा. आता सुरु होतो तो त्याच्या आयुष्यातला खरा ” जुगार ” कधी कधी असा वाटतं कि त्याच्या शेतमालाला बाजारभाव किती मिळेल हे देवाला देखील माहित नसावा. घेणारा व्यापारी हा कधी कधी असा बाजार सांगतो कि शेतकऱ्यांची ” तळपायाची आग मस्तकात “ जावी. पण तो बिचारा पुढचा विचार करून शांत बसतो. अहो एवढाच काय तरं तो ” मिळेल तोच भाव घेऊन गप घरी जातो. आणि मग मिळालेल्या तुटपुंज्या पैश्यातून तोच आधी देणी चुकवतो. ह्यातून शिल्लक काही राहत नसेलच पण राहिलच काही शिल्लक तर तो आपल्या ” देवा-दिकाला ” जातो. तुमच्या मनात आता आला असेल कि ” SAVINGS”. अहो ज्याने कधी ” मुला बाळांच्या ” वाढदिवसाला ” नवी कपडे ” न घेता फक्त ” बताश्यांवर “ काम भागवणारा.
शेतकऱ्यांकडून काय अपेक्षा करणार तुम्ही. तूरडाळ महाग झाल्या नंतर आंदोलन करणारे किंवा तुरडाळच न खाणारे पाहिलेच असतील. अहो पण खताची गोण महाग झाली म्हणून ” आंदोलन “ करणारा किंवा ते न वापरणारा शेतकरी तुम्ही पाहिला नसेल आणि तुम्ही कधी पाहणार हि नाही. तुम्हाला कदाचित माहित देखील नसेल कि ” यूरिया “ खताची गोण कितीला भेटते. 800 – 900 रुपयाला भेटणारा यूरिया हा त्याला 1100 – 1300 मध्ये विकत घ्यावा लागतो. आज पर्यंत शेतकऱ्यांनाला कोणतीही खताची गोण M.R.P. किमतीत उपलब्ध नाही झाली. ह्याचा आपण विचार कधी केला आहे का? तो बिचारा घेतो आणि आपल काम चालू ठेवतो. तो विरोध करू शकत नाही आणि त्याला तेवढा वेळ नाही.
सगळ्या गोष्टींना तोहद देऊन तो आयुष्यात ” जगण्यासाठी ” मेहनत करत असतो. आणि आपल्या मुला बाळाच्या ” उज्ज्वल भविष्याचा “ विचार करत असतो. पण ते हि कधी कोणाकडे तक्रार न करता किंवा कोणाकडे हात न पसरता. अहो घरात ” अठरा विश्व दारिद्र ” असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बापाने देखील मुलाला वडिलोपार्जित म्हणून फक्त आणि फक्त ” शेतीच ” दिलेली असते. स्वतःच्या पायावर लवकर उभा राहता यावा म्हणून वयाच्या 21 वर्षी बाप पोराचा लग्न लावतो. आणि ते हि शेतकऱ्यांच्या मुलीशीच कारण शहरातल्या मुलिंना ” शेती करणारा ” नवरा नको असतो. किंबहुना आपली मुलगी शेतात नसावी अस हि कित्येक ” आई बापाला ” वाटते . शेतात कष्ट करतो मिळलं त्यावर समाधान मानतो. ” शेती कर्ज “ काडून तो स्वतःसाठी ” भांडवल “ उभ करतो.
खूप मेहनत करूनतेच कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी तेही नाही जमलं तर त्याच्या पुढे एकच पर्याय राहतो तो म्हणजे ” आत्महत्या “. जरा विचार करा त्या मुलीच काय? जी ऐन तारुण्यात मुलगी ” विधवा “ होते. ती बिचारी आत्महत्या नाही करू शकत कारण ती ” माउली “ संपूर्ण आयुष्यात त्या ” लहान लेकरंडके “ बगुन शांत बसते. शेतकऱ्यांच्या लेकरांना नाही का वाटतात आपण शिकून मोठा व्हावा; डॉक्टर व्हावा, इंजिनीर व्हावा, पायलट व्हावा, सरकारी नौकरी करावी. पण तो हि आपली घरची ” आर्थिक परिस्तिथी “ बघून शांत बसतो
आता मला एवढ्या असंख्य समस्यांना तोंड देऊन स्वतःला सावरून जीवन जगणाऱ्या शेतकर्यांनला बघून त्याच्या समोर आपल्या समस्या काय आहेत. तुम्ही कधी विचार तरी केला आहे का? खर्च आपल्या समोर, सभोवताली आपल्या आयुष्यातील “INVISIBLE “ असणारा आपल्या शेतकरी बांधवाचा आपण कधी विचार केला आहे का? आपल्या दिवसाची सुरवात हि त्यांने कष्ट करून शेतात ” पिकवलेल्या अन्ना ” पासून होते तरं ते रात्रीच्या जेवणापर्यंत.
अशा ह्या ” परोपकारी शेतकर्यांनला “ आपण कधी मनापासून धन्यवाद किंवा आभार मानायला पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *