आत्मविश्वास

Uncategorized

मित्रांनो आयुष्यात नविन काही तरी करायची खूप इच्छा असते. पण मनात विचार येतो की यार माझ्याने एवढी मोठी जबाबदारी पार पडेल का? जसे मोठ मोठे आपण स्वप्न पाहतो ना. तेवढी मोठी जबाबदारी आपण उचलत नाही. कारण आपला आपल्यावर च विश्वास नसतो. कारण आपला जर आपल्यावर विश्र्वासच नाहीये मग कस काय मोठ होणार. यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट,एक महत्वाची बाब म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही खूप व्हिडिओ पाहता ते पाहून खूप मोठे काही करायचे असे स्वप्न पाहता पण करत काहीच नाही.पण तरीही बऱ्याचदा तुम्हाला वाटत आता सुरुवात झालीच पाहिजे कारण वेळ खूप निघून गेलेली असते. नेमक काय करायच आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे विचार करून आपण गोंधळून जातो. त्यामुळे च आज अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल. तेवढेच नाही तर तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. पण त्या साठी तुम्हाला भरपूर गोष्टी आचरणात आणाव्या लागतील.
१. कशीही परिस्थिती असो चांगलाच विचार करणे- आयुष्यात खूप वेगळ्या वेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. आयुष्यात सुख आणि दुःख येत च राहत. आपल्या आयुष्यात दुःखाचे प्रसंग जरी आले तरी त्यात सुद्धा चांगल काही तरी घडलेलं च असतं. फक्त तेवढ शोधून काढायचं. त्याच वाईट प्रसंगातून काही तरी शिकायचं. त्यातून बोध घ्यायचा आणि सर्व वाईट विसरून जाऊन,हसत खेळत पुढच्या प्रवासाला निघायच. या तो मै जीतता हू, या तो मैं सिखता हू! हे कधीच विसरायचं नाही. जर नेहमी चांगलाच विचार केला तर नक्कीच तुम्ही आयुष्यात खूप मोठे व्हाल आणि तुमचा आत्मविश्वास नेहमी बळकट राहील. २. मी कसा आहे मला माहितीये- कधी कधी आपल्या वस्तूंवर,वागण्यावर टीका होते. आसं नक्कीच होत. आपल्या जवळच्या माणसांचे शब्दच आपल्याला जास्त वेदना देतात. टिकेतून स्वतःमध्ये काय सुधारणा करता येईल हे आपण जाणून घेतला पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणी काही बोललं ना तर ,आपण त्यात आपण काय सुधारणा केली पाहिजे.फक्त एवढाच विचार करायचा आणि बाकी सगळं विसरून जायचं.त्या विषयी जास्त विचार नाही करायचा,जास्त चिंता,चर्चा करण्यात वेळ घालवायचा नाही. फार लोड घ्यायचा नाही. सरळ सरळ या गोष्टी डोक्यातून काढून टाकायच्या. आसं जर वागत राहिले तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. ३.माझा माझ्यावर विश्वास आहे- आपल्याला एखाद नवीन काम करायचं असेल ना तर आधीच आपल्या मनात ते मला जमेल की नाही असे विचार येतात. अशावेळी आरश्यासमोर उभ राहून हे वाक्य म्हणायचे. मी प्रचंड शक्तिशाली आहे, मी खुप ताकतवान आहे, माझा माझ्या बुद्धीवर परिपूर्ण विश्वास आहे. मी असामान्य आहे आणि अशीच जी वाक्य तुम्हाला सुचतील तशी तुम्ही म्हणू शकता. यामुळे काम करायला वेगळीच ताकद येते,उर्मी येते. आत्मविश्वास वाढतो. ४. माझा कृती करण्यावर विश्वास आहे- नुसतं बोलून कोणतीही कामे होत नाहीत. नाहीच होत. ती फक्तं सुरुवात असते. पण तरीही तुम्ही बोलले म्हणजे सुरुवात झाली आहे कामाची. म्हणूनच सळसळत्या उत्साहाने आणि निदळ्या छातीने काम हातात घ्या. यश मिळे पर्यंत चिकाटीने काम करत रहा. लवकरच काम पूर्ण होतं आपल्याला यश मिळतं. आणि याच कामातून मिळालेला आत्मविश्वास पुढच्या कामांमध्ये वापरायचा असतो. आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला खूप पुढे घेऊन जात असतो. ५. मी धैर्याने आणि नियोजनपूर्वक भीतीचा सामना करतो- एखाद अवघड काम करताना भीती वाटणे साहजिक आहे. पण त्या भीतीला थारा द्यायचा नाही,भीतीला घाबरायचे नाही, तिला जवळ सुद्धा येऊन द्यायचे नाही. तिला मनात रेंगळूच द्यायचे नाही. या भितीचा ना हसत हसत सामना करायचा. आपण काम करत राहिलो आणि भीतीला भाव नाही दिला ना तर आपोआप च दूर पळून जाते. म्हणून कोणत्याच भीतीला घाबरायच नाही. भीतीवर मात करून आपले काम पूर्ण करायचे. अशा परिसथितीमध्ये आलेला आत्मविश्वास तुमचे आयुष्य बदलून टाकतो. ६. मी माझ्या उणिवा शोधतो आणि त्या दूर करतो- कालच्यापेक्षा आज स्वतःमध्ये मी की बदल केला हा प्रश्न आपण स्वतःला रोज विचारायचा. तुम्ही विचारता का? नाही ना.. तर आजपासून रोज विचारायचा.तुमची ही स्पर्धा इतरांशी नाही आहे. तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःशी आहे. म्हणजे आपण कालपेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या जास्त यशस्वी होत राहू.आणि या गोष्टी कधी विसरायच्या नाहीत.
प्रत्येक यशस्वी माणसामध्ये हसरा व प्रसन्न चेहरा असतो. रुबाबात ताठ चालन असत. बोलताना हातांची अर्थपूर्ण हालचाल,समोरच्या च्या डोळ्यामध्ये पाहत बोलणे, स्पष्ट खणखणीत आवाज, नर्म, विनोदी शैली असते त्यांची.या सर्व गोष्टी आपण यशस्वी माणसांकडून शिकत राहायचं आणि आपलं व्यक्तिमत्त्व बनवायचं. याच सर्व गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात आमलात आणल्या ना तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. या गोष्टी फक्त वाचू नका तर आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे आहे तर दृढ आत्मविश्वास असायलाच हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *