सिनेसृष्टीत जादुई दुनियेची निर्मिती कशी होते. ते वाचा.

Uncategorized

चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेमधील ३ महत्वाच्या प्रक्रिया – १) PRE – प्रोडक्शन २) प्रोडक्शन ३) POST- प्रोडक्शन

१) पूर्व तयारी(PRE – Production):- PRE -प्रोडक्शन म्हणजे एखाद्या चित्रपटाच शुटिंग सुरु होण्याच्या अगोदर केली जाणारी कामे किव्हा चित्रपटाची पूर्व तयारी. सगळ्यात पहिल्यांदा तर कथेच्या संकल्पनेविषयी मिटिंग घेतली जाते. लेखक, दिग्दर्शक, निर्माता यांच्या मध्ये कथा(SCRIPT) विषयी मिटिंग होते. आणि याच मिटिंग मध्ये याच कथेपासून पासून चित्रपट कसा तयार केला जाईल याच्यावर चर्चा केली जाते. स्क्रिप्ट ची पूर्ण उजळणी केली जाते आणि नंतर चित्रपटासाठी त्याची पटकथा बनवली जातो. चित्रपट महामंडळामध्ये प्रोडक्शन HOUSEची नोंद केली जाते. नंतर त्याच प्रोडक्शन HOUSE च्या नावाने बँकमध्ये अकाउंट ओपन केले जाते आणि सगळे पैश्याचे व्यवहार त्यातूनच केले जातात. शूटिंगसाठी आवश्यक असलेल्या जागा(LOCATION) शोधले जातात व चर्चा करून त्यातील योग्य ठिकाणांची निवड केली जाते. प्रोडक्शनसाठी क्रु(CREW) निवडला जातो. उदाहरणार्थ- कॅमेरामन,प्रोडक्शन व्यवस्थापक, नृत्यदिग्दर्शक,ध्वनी अभियंता(SOUND ENGINEER),मेकअप आरटिस्ट,संगीत दिग्दर्शक, इ. यांच्या सोबत करार(CONTRACTS AND AGREEMENTS) केले जातात.सगळ्या विभागातील प्रमुखांसोबत(Heads) मिटिंग होते.सर्व गोष्टींची चर्चा होते. आणि निर्मात्याकडून सर्वांना सूचना दिल्या जातात. नंतर ची महत्वाची प्रक्रिया म्हणजे ऑडिशन. प्रमुख कलाकारांची निवड आणि सहकलाकारांच्या निवडीसाठी ऑडिशन घेतले जातात. आणि त्या नंतर त्याची निवड होते. सगळ्या विभागाचे प्रमुख, निर्माता,दिग्दर्शक,कलाकार यांच्यासोबत पटकथेचे वाचन केले जाते. नंतर स्टोरी बोर्ड तयार केले जाते. पटकथेच्या मदतीने कलाकारांकडून कोणत्या क्रिया(Actions) करणे गरजेचे आहे, तसेच कॅमेरामन कडून कोणत्या प्रकारचे शॉट व अँगल घेणे अपेक्षित आहे हे तपशील मध्ये दाखवण्यासाठी स्टोरी बोर्ड स्टोरी बोर्ड तयार केले जाते.यामध्ये ब्लॉकिंग आणि स्टेजिंग संदर्भात असलेल्या बारकाव्यांची चित्रांच्या संदर्भात मांडणी केली जाते. आर्ट डायरेक्शन आणि सेट डिझाईनिंग बऱ्याचदा कथेत असलेल्या वास्तवातील शूटिंग लोकेशन वर शूट करणं शक्य नसतं. त्यासाठी त्याचा सेट बनवला जातो. उदाहरणार्थ जुन्या काळातील चाळी, राजवाडे, शाळा, हॉटेल, किल्ले इत्यादींचे सेट बनवले जातात. हे सेट डिझाईन करून आर्ट डिरेक्शन टीमकडून बनवून घेतले जातात. नंतर येतात ते कॉस्ट्यूम चित्रपटात लागणारे सर्व कपडे, हीरो हीरोइन चे कपडे, सर्व कलाकारांचे कपडे डॉक्टर, पोलीस, गुंड इ. अश्या सगळ्या कलाकारांचे कपडे त्यांच्या मापाप्रमाणे आधीच बनवून घेतले जातात. शूटिंग साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या परवानग्या म्हणजेच परमिशन NOC मिळवणे. ज्या जागांवर शुटींग करायची आहे त्या जागांच्या परवानग्या मिळवने हे देखील महत्वाचे असते. शूटिंग सुरू होण्यापूर्वी कथा तपासून (Script Breakdown) करून घेणे हा देखील पूर्व तयारीचा एक भाग आहे. निवडलेल्या कलाकारांसोबत सराव म्हणजेच फायनल रिहर्सल करून घेणे. शूटिंग च वेळापत्रक तयार करणे आणि त्या नुसार कॉल शीट बनवणे हा सुद्धा अत्यंत महत्वाचा चित्रपट पूर्व तयारीचा भाग आहे. अशा प्रकारे पूर्व तयारी चा भाग संपतो नंतर येतो तो प्रोडक्शन.
२) प्रोडक्शन(Production) – प्रोडक्शन म्हणजे वास्तविक चित्रपटाचे शुटींग. यातल्या ५ महत्वाच्या गोष्टी म्हणजे अवरोधित(Blocking) करणे. कॅमेरा अवरोधित करण्यापूर्वी कलाकारांना अवरोधित करणे. दुसरा म्हणजे लाइट्स. दिग्दर्शक आणि कॅमेरामन गॅफर च्या मदतीने लाइट्स ची सोय (Arrangements) करतात. नंतर येत ते सेट वरती होणारी तालीम(rehersal). कलाकार, साऊंड, कॅमेरामन यांची तालीम घेतली जाते आणि टेस्ट शॉट घेऊन सगळं व्यवस्थित होतंय ना? याची खात्री केली जाते. टेस्ट शॉट नंतर सर्व नीट समायोजन करून कलाकारांचा मेकअप मध्ये सर्व सुधारणा करून त्यांना अंतिम शॉट साठी तयार केले जाते. नंतर होता ते शूटिंग. कलाकारांचे प्रदर्शन, कॅमेरा,साऊंड, लाईट यांच्या एकत्रित साहाय्याने दिग्दर्शकाला अपेक्षित असा सीन शूट केला जातो. आता पाहूया प्रोडक्शन दरम्यान केली जाणारी कामे. परिवहन हे महत्वाचं प्रोडक्शन च काम आहे. कलाकारांची ने-आन करणे, साहित्यांची ने-आन करणे, टेकनिशियंस, लाइट्स ची ने-आन हे सर्व काम परिवहनामध्ये केले जाते. जितके दिवस शूट आहे तेवढ्या दिवसाच्या खानपानाची व्यवस्था करणे हा सुद्धा प्रोडक्शनचाच भाग आहे. कलाकारांना 2 सीन मध्ये ब्रेक घेऊन आराम करण्यासाठी आणि मेकअप करण्यासाठी वैनिटी वैन(Vanity van) गरजेची असते. आउटडोअर शूट साठी जनरेटर सुद्धा लागतो. दररोज लागणाऱ्या खर्चाची तरतूद आणि त्या नुसार लागणारे नियोजन हा सुद्धा प्रोडक्शन चा भाग आहे. स्क्रिप्ट ब्रेकडाउन नुसार रंगमंचावर किंव्हा सेट वर लागणारी सामग्रीची व्यवस्था करणे हे सुद्धा काम प्रोडक्शन प्रक्रियेमध्ये केले जाते. जर शूटिंग च्या दरम्यान प्राण्यांचा वापार होणार असेन तर त्यांच्या खाण्या पिण्याची, आरामाची सोय करणे.शूटिंग जर दूर ठिकाणी होत असेल तर कलाकार आणि क्रू च्या राहण्याची व्यवस्था करणे. चिकित्सकीय संसाधनांची व्यवस्था करून ठेवणे.
३)पोस्ट प्रोडक्शन(Post Production)- पोस्ट प्रोडक्शन म्हणजे शूटिंग पूर्ण झाल्यावर होणारी कामे. चित्रपट शूट करून झाल्या नंतर ते सगळ फुटेज एडिटिंग लॅब मध्ये घेऊन जातात. त्यातले सर्वोत्तम शॉट वेगळे केले जातात आणि अँगल प्रमाणे ते लावले जातात. कटस् आणि संक्रमने(Transitions) वापरून ते अजून प्रभावी बनवले जातात. नंतर संवाद डबिंग केला जातो तसेच पार्श्वभूमी आवाज(Background Sound) जोडला जातो. कथेचा मूड आणि विषय लक्षात घेऊन त्यांच्यात रंग दुरुस्ती(Colour Correction) केली जाते. शूटींग दरम्यान तिथे बरेच आवाज असतात जे पोस्ट प्रोडक्शन मध्ये जोडले जातात. जसे की चालताना बुटांचा आवाज, ग्लास मध्ये पाणी ओतल्याचा आवाज, बंदुकीतून गोळी झाडल्याचा आवाज, घोड्याच्या टापांचा आवाज , गाडीच्या हॉर्न चा आवाज इ. हे सगळे आवाज ध्वनी प्रभावाचा (Sound Effect) वापर करून जोडले जातात. चित्रपटात दिसणारे विशेष प्रभाव,दृश्य प्रभाव, सीजीआय,अ‍ॅनिमेशन हे सुध्दा पोस्ट प्रोडक्शन मध्ये येते. आपला चित्रपट जगभरातील प्रेक्षकांकडून पाहीला जावा आणि त्यांना समजण्यास सोपा जावा यासाठी उपशीर्षके जोडले जातात. तयार झालेला चित्रपट दिग्दर्शक, निर्माता ,कलाकार पाहतात आणि त्या नंतर certification साठी पाठवला जातो. यात पहिल्यांदा डॉल्बी डिजिटल आणि नंतर सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला जातो. सेन्सॉर प्रमाणपत्रा नंतर संगीत लाँच केले जाते,पोस्टर लाँच केले जातात, पत्रकार परिषद केली जाते. नंतर चित्रपटाचे विपणन(Marketing) केले जाते. प्रसिद्धी साहित्य, विविध कार्यक्रम केले जातात.सोशल मीडिया विपणन केले जाते. आणि सगळ्यात शेवटी चित्रपटाचे वितरण (Distribution)केले जाते. या कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती चित्रपटगृह आहेत आणि कोणत्या चित्रपट गृहांमध्ये ही फिल्म दाखवली जाणार ते ठरवून अखेर चित्रपट प्रदर्शित केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *