नात्यांशिवाय जगणे अवघड… कसे ? ते वाचा.

Uncategorized

खरंच माणसाला प्रत्येकाच्या मायेने किती जखडून ठेवलंय नाही का? प्रत्येक व्यक्तीला नाती असतात. हिच नाती आपल्याला एकमेकांच्या प्रेमात गुरफटून टाकतात. प्रत्येक आनंदाच्या क्षणी तसेच दुखाच्या वेळी आपल्याला साथ देत आपल्याला ही या नात्याशिवाय जगणे कठीण असते. कुठल्याही आनंदाच्या क्षणी खऱ्या अर्थाने आपले लोकच आपल्या सोबत नसतील तर कोणताही आनंदाचा क्षण उपभोगल्या सारखा वाटत नाही.म्हणूनच प्रत्येकाला माणसांशिवाय प्रेमाशिवाय जगणेच अशक्य असते. या नात्यांमध्ये मला पुरुषांचा हेवा वाटतो.कारण मुलगा जन्माला येतो, तेव्हा घरातील सर्वच जण आनंदून जातात. वंशाचा दिवा म्हणून तो घरात सर्वांचा लाडका असतो. आजी त्याला आपल्या डोळयासमोर एक क्षण ही दूर होऊ देत नाही. आईच्या काळजाचा तर तो तुकडाच असतो. त्याचे रुसवे-फुगवे काढण्यात ती आपले आयुष्य घालवते. त्याला घडवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालते. त्याच्या प्रगतीने तिच्या डोळ्याचे पारणे फिटते. त्यानंतर येते ते बहिणीचे नाते. ती तर त्याची जास्तच काळजी घेत असते.त्यामुळे असेल कदाचित आपल्याकडे रक्षाबंधन,भाऊबीज हे सण साजरे केले जातात. हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा, प्रेमाचा, मायेचा सण असतो. लग्न झाल्यावर एक नवीन नाते त्याच्यासोबत जोडलं जाते ते म्हणजे पत्नीचे, आपलं घर, मायेची माणसं सोडून ती त्याच्या नावाचे कुंकू लावते आणि त्याच्या घरात, त्यांच्या माणसांमध्ये मिसळून जाते. ती नेहमी आपला नवरा आपले घर यांचाच विचार करते.नार्याच्या सुख-दुखात आपले सुख-दुख शोधते. संकटकाळी त्याच्या पाठीशी उभी राहते. त्याची प्रत्येक गोष्ट मान्य करून त्याला साथ देत असते. कारण तो तिच्यासाठी खूप महत्वाचा असतो. ती त्याच्यावर अपार प्रेम करत असते.
त्यानंतर त्याच्या आयुष्यात येते त्याची छकुली, तिही तिच्या बाबांवर खूप प्रेम करत असते. तिला तिच्या बाबाचा अभिमान असतो. हो अभिमान… कारण तिला वाटत असत तिच्या बाबासारख दुसर कोणी असूच शकत नाही. तिचे बाबा तिचे खूप लाड करत असतात. तिला जे हवे ते तिच्यासाठी आणत असतात.तिच्या बाबांनाजरा काही झाले तर ही छकुली बैचेन होते तिचे बाबा तिच्यासाठी सर्वस्व असतात. आईपेक्षाही जास्त जवळचे असतात. मूलीनंतर त्याच्या आयुष्यात येते ती नात. मुलाची किव्हा मुलीची मुलगी. ती सुद्धा आपल्या आजोबांवर तितकंच प्रेम करते. तिच्यासाठी ही तिचे आजोबा तितकेच महत्त्वाचे असतात. अशाप्रकारे जन्म झाल्यापासून वृध्दावस्थेपर्यंत प्रत्येक नात्याच्या माध्यमातून पुरुषाला प्रेम ,माया, आपुलकी मिळत असते. नाती ही खूप पवित्र असतात. ती आपापल्या परीने निभावली जातात. अशा या नात्यांना कधी तडा जाणार नाही याची नेहमीच काळजी घेतली जाते. आहेत ना सर्व पुरुष भाग्यवान !
या जगामध्ये आपणच आपले असतो. आई आणि वडील आपले असतात. कधी मनाला भयंकर दुःख झाले तर तुम्ही आई वडिलांना सांगता का? आई एवढे कष्ट करते. तिच्या दुःखाला आपण ओळखतो. पण तिच्या वेदना ती सांगते का ? का नाही? कारण तिला आपल्याला दुखवायचे नसते. तिला चिंता असते आपली. म्हणून ती आपली असते.आपण खूप चांगली गोष्ट लगेच जावून आई-वडिलांना सांगतो. पण एखादी चूक केली असेल तर? ती गोष्ट आपण लपवतो ना? ते फक्त आपण मनाशीच शेअर करतो. आपल्याला आई-वडिलांची साथ विशिष्ट कालावधीपर्यतच असते. नंतरचे काय? ठाऊक आहे. अनेक जण भेटतात. पण ती नवी नाती असतात. त्या नात्यांवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवण्याचा प्रयत्न जरी केला तरी ठेवू शकत नाही. अशा वेळी आपल्या सोबत कोण असते? आपल्या लहान लहान वेदनाही आपणच जाणून घेतो. आणि स्वतः ला आधार देतो. उदयाच्या येणाऱ्या भविष्यासाठी आजपासूनच स्वत:ला बळकट बनवायला शिकवा आणि आपल्या आई वडिलांशी मनमोकळेपणाने बोला जेणेकरून उदया भविष्यात याचा पश्चाताप नको की आई वडिलांसारखे श्रेष्ठ नातं असतानाही आपण त्यांना आपल्या वेदना सांगितल्या नाहीत. लक्षात ठेवा होणारा पश्चाताप इतर वेदनांपेक्षा दहा पट जास्त दुःख देईल !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *